महत्वाच्या बातम्या

  वर्धा बातम्या

जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड काढण्यासाठी प्रभागस्तरावर शिबिराचे आयोजन करा : डॉ.ओमप्रकाश शेटे बातम्या - Wardha

जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड काढण्यासाठी प्रभागस्तरावर शिबिराचे आयोजन करा : डॉ.ओमप्रकाश शेटे


- आयुष्मान भारत व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांकडे योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आयुष्मान कार्डची संख्या वाढविण्याची गरज आहे. यासाठी प्रभाग निहाय शिबिराचे आयोजन करावे. तसेच राशन दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत कार्ड काढण्यासाठी जनजागृती करावी, अशा सुचना आयुष्मान भारत महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्याात.जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणी आढावा घेण्यात आला, यावेळी त्यांनी सुचना केल्यात. बैठकीला आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विषमुक्त शेतीचा पॅटर्न : वर्ध्यात ८ हजारांवर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे बातम्या - Wardha

विषमुक्त शेतीचा पॅटर्न : वर्ध्यात ८ हजारांवर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे


- ६८ शेतीगटांच्या माध्यमातून ३ हजार ७७५ हेक्टरवर प्रयोग; उत्पादित मालासाठी हक्काची बाजारपेठ उभारण्याची गरजविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता धोक्यात येत असताना वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेतीची कास धरली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ८ हजार १२५ शेतकऱ्यांनी ३ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात विषमुक्त आणि शाश्वत शेतीचा नवा पॅटर्न आकारालायेत आहे.सन २०२५-२६ मध्ये ६ हजार ७५०, तर सन २०२६-२७ मध्ये १ हजार ३७४ शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, पारंपरिक रासायनिक शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक शे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नरसिंगपूर परिसरात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ : जेरबंद करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश बातम्या - Wardha

नरसिंगपूर परिसरात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ : जेरबंद करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश


- ड्रोन कॅमेरे, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल; युद्धपातळीवर वाघाचा शोध सुरूविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी आष्टी : तालुक्यातील नरसिंगपूर जंगलालगतच्या शेतात नागपंचमीच्या दिवशी पूजा करीत असताना शेतकरी रामभाऊ भोयर यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन त्याला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. आदेश प्राप्त होताच वनविभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून वाघाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.रामभाऊ भोयर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा क...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
संजय गांधी निराधार योजनेच्या २०८ अर्जांना मंजुरी : लाभार्थ्यांना मिळणार सामाजिक सुरक्षेचा आधार बातम्या - Wardha

संजय गांधी निराधार योजनेच्या २०८ अर्जांना मंजुरी : लाभार्थ्यांना मिळणार सामाजिक सुरक्षेचा आधार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : तालुका ग्रामीण संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विशेष सहाय्य योजनांतर्गत प्राप्त अर्जांची सविस्तर छाननी करण्यात आली. पात्रता निकषांची तपासणी केल्यानंतर एकूण २०८ पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली.बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनांमधून लाभ मिळण्यासाठी दाखल झालेल्या अर्जांवर चर्चा करण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे, पात्रता आणि शासनाच्या निर्धारित निकषांनुसार अर्जांची तपासणी करण्यात आली.गरीब, गरजू, निराधार, वृद्ध, विधवा तसेच दिव्यांग नागरिकांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. या योजन...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वर्ध्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली : ६०० जणांचा उत्स्फूर्त सहभाग बातम्या - Wardha

वर्ध्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली : ६०० जणांचा उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत वर्धा येथील शिक्षा मंडळ संचलित सर्व महाविद्यालयांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी वर्धा ते बापू कुटीपर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या उत्साहात निघालेल्या या रॅलीत सुमारे ५०० विद्यार्थी आणि १०० प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले. हातात तिरंगा ध्वज आणि देशभक्तीपर घोषणांनी रॅलीचा संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला.रॅलीपूर्वी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेतली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सक्षम समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.यानंतर शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव तसेच सर्व महाविद्यालयांचे प्र...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वर्ध्यात म्युझियम ऑन व्हील्स फिरत्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद बातम्या - Wardha

वर्ध्यात म्युझियम ऑन व्हील्स फिरत्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


- २० हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी अनुभवला प्राचीन जागतिक इतिहासविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : इतिहास हा केवळ पुस्तकांच्या पानांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता यावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित म्युझियम ऑन व्हील्स या फिरत्या प्रदर्शनाला जिल्ह्यात अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.जर तुम्ही संग्रहालयापर्यंत पोहोचू शकत नसाल, तर संग्रहालय तुमच्या दारी येईल या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २० हजार विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतला आहे. यावर्षीचे प्रदर्शन भूतकाळातील जाळे भारत आणि प्राचीन जग या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे.एका विशेष व अत्याधुनिक सुविधेने सुसज्ज असलेल्या मोठ्या बसमध्ये हे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा जिल्हा दौरा बातम्या - Wardha

आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे २४ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.२४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत कार्ड वितरण बाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी ११.३० वाजता पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी १२ वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे येथे भेट देतील. दुपारी १ वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
मृद व जलसंवर्धनासाठी आयोजित महा वॉकेथॉनमध्ये हजारोंचा सहभाग बातम्या - Wardha

मृद व जलसंवर्धनासाठी आयोजित महा वॉकेथॉनमध्ये हजारोंचा सहभाग


- हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ- प्रथम दहा विजेत्यांना रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : राज्याच्या जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जयंती दिन तसेच जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आयोजित महा वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित जलसंधारणाचा जागर केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सुरुवातीस मृद व जलसंवर्धणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा परिषदे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ई-पिक पाहणीत आष्टी तालुक्याची उल्लेखनीय कामगिरी बातम्या - Wardha

ई-पिक पाहणीत आष्टी तालुक्याची उल्लेखनीय कामगिरी


- बोरखेडी व चामला गावांत १०० टक्के ई-पिक पाहणी पूर्ण- पोलिस पाटलांचा विशेष गौरवविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : खरीप हंगाम २०२६-२७ मधील ई-पिक पाहणी मोहिमेत आष्टी तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील बोरखेडी व चामला या गावांमध्ये १०० टक्के ई-पिक पाहणीचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात १०० टक्के ई-पिक पाहणी पुर्ण करणारी ही पहिली गावे ठरली आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या हस्ते दोन्ही गावांतील पोलिस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पिक पाहणी मोहिमेंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाइन नोंद करणे आवश्यक आहे. आष्टी तालुक्यात ई-पिक सहाय्यकांच्या माध्यमातून डीसीएचएमएच या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे.बोरखेडी व चामला गावांमध्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेंद्रिय करटुले शेतीचा यशस्वी प्रयोग : केळापुर येथील शेतकऱ्याची यशोगाथा बातम्या - Wardha

सेंद्रिय करटुले शेतीचा यशस्वी प्रयोग : केळापुर येथील शेतकऱ्याची यशोगाथा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातील केळापूर गावचे प्रयोगशील शेतकरी अशोकसिंह धुमाळे यांनी नैसर्गिक साधनांचा योग्य वापर आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून भाजीपाला क्षेत्रात करटूले शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी १० गुंठ्ठे क्षेत्रात ४० हजार रुपयाचे निव्वळ उत्पादन घेऊन उत्पन्नाचा एक नवा मार्ग शोधून काढला.अशोकसिंह धुमाळे यांनी मे २०२५ मध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने करटुले पिकाची लागवड केली.  त्यांनी जंगलातून करटुल्याचे कंद व बियाणे जमा करून स्वतः बियाणे तयार केले. लागवड दरम्यान नर व मादी झाडांचे योग्य प्रमाण राखण्यासाठी दर १० मादी झाडांनंतर १ नर झाडाची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. पहिल्या वर्षी लागवडीनंतर अवघ्या १.५ महिन्यात फळधारणा सुरू झाली. त्यामधून आठवड्यातून २ वेळा तोडा करून प्रति तोडा ४ ते ५ किलो फळे मिळाली. बाजारात ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →