पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन होणार ‘भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशिल, आदिवासी बहुल असून, जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी युवक हे होतकरू व विविध कलागुणांनी निपूण आहेत. परंतु त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा असे कुठलेही साधन जिल्ह्यामध्ये उपलब्ध होत नसल्या कारणाने दुर्गम भागातील युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही हि बाब लक्षात घेवुन त्यांच्या कलागुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून ‘वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातील ७ हजार ९९० खेळाडूंनी १५ ते २० फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पोस्टे/उपपोस्टे/पोमके स्तरावर व ५८० खेळाडूंनी २५ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत उपविभागीय स्तरावर स्पर्धेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामधुनच उपविभागीय स्तरावरील स्पर्धेतील विजेते संघ महाराणा प्रताप क्लब (गडचिरोली), देसाईगंज कबड्डी संघ (कुरखेडा), कबड्डी संघ वाघभुमी (धानोरा), जय बजरंगबली क्लब कारवाफा (पेंढरी), कोरेली कबड्डी संघ पेरमीली (अहेरी), बाजीराव फिटनेस क्लब संघ कृष्णार (एटापल्ली), जय ठाकुरदेव क्रिडा मंडळ परसलगोंदी (हेडरी), लिटील बायस कबड्डी संघ पिटेकसा (भामरागड), जय गोंडवाना कबड्डी संघ (जिमलगट्टा), उडानबॉईज क्लब कबड्डी संघ (सिरोंचा) असे १० संघातील पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे १२० खेळाडूंकरीता २४ ते २५ सप्टेंबर रोजी जिल्हा स्तरीय वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे आयोजन वीर शहीद पांडू आलाम सभागृह, पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पार पडणार असुन सदर स्पर्धेचे फेसबूकच्या https://www.facebook.com/GadPolice/?ti=as  या लिंकवर तसेच यु-ट्युबच्या SP Gadchiroli Police या चॅनलवरील https://youtube.com/channel/UCmd6To5TbsfeCLJ3-BrbdBw या लिंकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 
या १० संघामध्ये होणाऱ्या लढतीमधून अंतिम ३ संघाची निवड प्रथम, द्वितीय  व तृतिय क्रमांकाकरीता होणार असून गडचिरोली पोलीस दलाकडून प्रथम पारितोषीक २५ हजार रूपये, द्वितीय २० हजार रूपये, तृतिय १५ हजार रूपये बक्षीस देवून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रासह सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, प्रो-कबड्डी लिग मध्ये यु-मुंबा संघाच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये त्यांच्या स्टार खेळाडू सोबत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यु-मुंबाचा टिम लिडर  संदिप सिंग व यु-मुंबाचा संघाचा उत्कृष्ट खेळाडू  अजिंक्य पवार उपस्थित राहुन उत्कृष्ट खेळाडुंची निवड करणार आहेत.
कोवीड-१९ रोगाची साथ असल्याकारणाने या कबड्डी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण फेसबुक व यु ट्युबवर लाईव्ह दाखविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले आहे. सदर स्पर्धेच्या आयोजनास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, पोलीस उप-अधिक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार यांनी अथक परीश्रम घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-23
Related Photos