नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ड्रेस कोड बंधनकारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) 2021 चे आयोजन 12 सप्टेंबरला करण्यात आले आहे.  मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी हजारो विद्यार्थी करत होते. मात्र, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या माहितीनुसार NEET UG 2021 ठरलेल्या वेळेतच देशभरात होणार आहे. 
दरम्यान NTA ने परीक्षेसाठी विशिष्ट ड्रेस कोड लागू केला आहे. जे विद्यार्थी हा ड्रेस कोड फॉलो करणार नाही त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे दागिने, धातूच्या वस्तू, मोबाईल फोन घेऊन जाता जात येणार नाही. 

मुलींसाठीचा ड्रेस कोड

मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे
महिला विद्यार्थ्यांनी फुल हाताचे कपडे, एम्ब्रायडरी, ब्रोच किंवा मोठ्या बटणाचे कपडे घालू नये.
उंच टाचेचे बूट आणि मोठे खिसे असलेली जीन्स घालू नये.
तसेच दागिने, कानातील झुमके, अंगठ्या, बांगड्या, नाकात चमकी, पायात पट्ट्या घालू नये. 

मुलांसाठीचा ड्रेस कोड

मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे
पुरुष विद्यार्थ्यांना अर्ध्या हाताचे शर्ट, टी-शर्ट घालण्यास परवानगी आहे. नीट परीक्षेत संपूर्ण बाह्याचे शर्ट घालण्यास परवानगी नाही.
परीक्षेची मोठ्या खिशांच्या, मोठ्या बटणाचे कपडे घालण्यास परवानगी नाही
पुरुष विद्यार्थ्यांना ट्राउजर घालण्यास परवानगी आहे.
  Print


News - World | Posted : 2021-09-03Related Photos