गावभेट अभियान ग्रामपंचायत इसापुर येथे देवळी तहसीलदाराची भेट


- सेवा संकल्प अभियांतर्गत उपक्रम
- गावातील सार्वजनिक सुविधांची पाहणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : नागरीकांच्या दैनदिन व पायाभुत सुविधांबाबत तक्रारीचे स्थानिक स्तरावर वर्गीकरण, उपाययोजना व कायदेशिर दृष्टीकोनातुन जलद निवारण, शासकीय योजना व सार्वजनिक सेवांची प्रत्यक्ष पडताळीणी तसेच स्थानिक संस्थाचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने सेवा संकल्प अभियानांतर्गत गावभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देवळी तहसिलदार समर्थ क्षीरसागर यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत इसापुर येथे भेट देऊन पाहणी केली व संवाद साधला.
सदर गावभेट अभियानमध्ये नागरीकांशी संवाद साधून गावातील पायाभूत सेवा व सुविधा, वीज, रस्ते, पाणी इत्यादींबाबत समस्या जाणून घेवून त्यांचे निराकरण तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. गावातील प्राथमिक शाळेमध्ये भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावातील युवकांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. गावातील आरोग्य उपकेंद्रास भेट देवून नागरीकांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांनी अतिक्रमीत पांदन रस्ता पाहणी करुन नागरीकांच्या समस्या जाणुन घेतल्या. नागरीकांच्या इतर विभागाशी असलेल्या अडचणींबाबत संबंधित विभागास संपर्क करुन समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले.
सदर गावभेट अभियानमध्ये सरपंच नितीन गंभीर, देवळीचे मंडळ अधिकारी कावरे, नांदोराचे ग्राम महसूल अधिकारी सत्यम निखाडे, ईसापुरच्या ग्रामविस्तार अधिकारी वर्षा खंडेराव, कनिष्ठ अभियंता अभिषेक बागडे, इसापुर कृषी सहायक प्रिती नेमाडे, पोलिस पाटील प्रफुल कारेमोरे, ओमप्रकाश वानखेडे, पशुसंवर्धन अधिकारी तसेच इसापुर येथील गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




