महत्वाच्या बातम्या

 अनुष्का फरकाडेची ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथील प्रतिभावान विद्यार्थिनी कुमारी अनुष्का भास्कर फरकाडे हिची ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण असून तिचे अभिनंदन करण्यात आले.

अनुष्काच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या असमा खान, क्रीडा शिक्षिका शबाना पठाण तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनुष्काने उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे तसेच बल्लारपूरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा विद्यालय परिवाराने व्यक्त केली. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





  Print






Related Photos