महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम बातम्या - Chandrapur

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम


- १७ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना पडताळणी अर्ज सादर करण्याची संधी; इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी /चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या कालावधीत विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर करून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ एल. गायकवाड यांनी केले आहे.शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये MHT-CET, NEET, JEE, MBA, B.Ed., Ph.D., B.Sc. Agriculture, B.Pharm., B.Sc. Nursing आदी प्रवेश परी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
उद्योग वाचले तर हजारो संसार सुरक्षित : खाकी च्या पहाऱ्यात औद्योगिक क्षेत्र, खंडणीखोरांना पोलिसांचा इशारा बातम्या - Chandrapur

उद्योग वाचले तर हजारो संसार सुरक्षित : खाकी च्या पहाऱ्यात औद्योगिक क्षेत्र, खंडणीखोरांना पोलिसांचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : उद्योगांच्या भिंतींच्या आत केवळ यंत्रे आणि उत्पादन नसते, तर हजारो कामगारांचे संसार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे भविष्य जोडलेले असते. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांची सुरक्षा ही केवळ कंपनीची जबाबदारी नसून ती कायदा व सुव्यवस्थेचाही महत्त्वाचा भाग आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत चोरी, भंगार चोरी आणि कंपन्यांवर बेकायदेशीर दबाव आणणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.तुकुम रोड येथील पोलीस सभागृहात पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक आस्थापनांच्या सुरक्षेबाबत विशेष आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आयुष्मान कार्ड नागरिकांपर्यंत पोहचवा : पालक सचिवांकडून विविध विभागाचा आढावा बातम्या - Chandrapur

आयुष्मान कार्ड नागरिकांपर्यंत पोहचवा : पालक सचिवांकडून विविध विभागाचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना नामांकित रुग्णालयात उपचार घेता यावे, या दृष्टीने प्रधानमंत्री आयुष्मान भारत (आभा) कार्ड हे अतिशय महत्वाचे आहे. या कार्डचे वाटप करून नागरिकांपर्यंत त्याचे फायदे पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशा सुचना राज्याचे अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या.नियेाजन सभागृह येथे विविध विभागांचा आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्ह्यातील काही विषय शासनस्तरावर प्रलंबित असतील तर त्याबाबत अवगत करावे, जेणेकरून संबंधित विषयाला गती देता येईल, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, ताडोबा अंधारी व्याघ्र प्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
१९ गुन्ह्यांच्या कुख्यात आरोपीवर एमपीडीएचा दणका : अमोल ईलमकर एक वर्षासाठी स्थानबद्ध बातम्या - Chandrapur

१९ गुन्ह्यांच्या कुख्यात आरोपीवर एमपीडीएचा दणका : अमोल ईलमकर एक वर्षासाठी स्थानबद्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी सराईत आणि धोकादायक गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार अमोल आदेश ईलमकर २६ वर्षे रा. समतानगर, वॉर्ड क्र. ६, दुर्गापूर याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.ईलमकर याच्याविरुद्ध दुर्गापूर, रामनगर, बल्लारपूर, घुग्घुस आणि मुल पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ, दुखापत तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत तब्बल १९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पशुधनाच्या ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाची मागणी बातम्या - Chandrapur

पशुधनाच्या ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : संतोषी माता प्रभागातील पशुपालकांच्या पशुधनासाठी चारा व चराईकरिता वापरला जाणारा पारंपरिक मार्ग बंद झाल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येची दखल घेत नगराध्यक्ष डॉ. अल्का अनिल वाढई यांनी १८ सप्टेंबर रोजी मुख्य वनसंरक्षक, वाहतूक व विपणन विभाग बल्लारशाह यांना पत्र पाठवून पशुधनाच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.संतोषी माता प्रभागातील अनेक नागरिक वर्षानुवर्षे पशुपालन व्यवसाय करीत आहेत. त्यांचे पशुधन चारा व चराईसाठी वनविभागाच्या हद्दीलगत असलेल्या परिसरात जाते. यासाठी सुरक्षा भिंतीमध्ये असलेल्या पारंपरिक मार्गाचा वापर केला जात होता. मात्र, वनविभागाच्या कारवाईनंतर हा मार्ग बंद करण्यात आल्याने पशुपालकांसमोर जनावरे चराईसाठी नेण्याची तसेच परत आणण्याची समस्या निर्माण झाली आहे.मार्ग बंद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कत्तलीच्या दारात पोहोचलेल्या तीन गोवंशांना जीवदान : रामनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई बातम्या - Chandrapur

कत्तलीच्या दारात पोहोचलेल्या तीन गोवंशांना जीवदान : रामनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कत्तलीसाठी घरात डांबून ठेवलेल्या तीन गोवंशांचा जीव वाचवण्यात रामनगर पोलिसांना यश आले. रय्यतवारी कॉलरी परिसरातील डिस्पेन्सरी चौकात पोलिसांनी छापा टाकून दोन गायी आणि एका गौ-हाची सुटका केली. या कारवाईत गोमांसासह कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपूर शहरात गोवंशांची अवैधरित्या कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी रामनगर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाकडून अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर लक्ष ठेवण्यात येत होते.दरम्यान, रय्यतवारी कॉलरी येथील डिस्पेन्सरी चौक परिसरात अब्दुल गणी शेख ईस्माईल कुरेशी ४९ वर्षे याने आपल्या घरात गोवंश कत्तलीसाठी डांबून ठेवले असून ग...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कोब्राच्या चौकशीत अंतरजिल्हा चोरीचे धागेदोरे : बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई बातम्या - Chandrapur

कोब्राच्या चौकशीत अंतरजिल्हा चोरीचे धागेदोरे : बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर येथील रेल्वे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोदामातून लोखंडी अँगल, प्लेट, जॅक आदी साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करीत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मुख्य आरोपी रुषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम याच्या चौकशीत चोरीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.विसापूर येथील रेल्वे गोदामातून लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासादरम्यान दोन विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. आरोपींची नावे रुषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम २५वर्ष रा. विसापूर आणि रोहन राजू सिडाम १९ वर्ष रा. विसापूर ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कंत्राटातून मलिंदा लाटणाऱ्या ठेकेदार आमदाराला जनतेच्या समस्यांची काय जाणीव? : आ. विजय वडेट्टीवार  बातम्या - Chandrapur

कंत्राटातून मलिंदा लाटणाऱ्या ठेकेदार आमदाराला जनतेच्या समस्यांची काय जाणीव? : आ. विजय वडेट्टीवार 


- चिमूरच्या जनाक्रोश मोर्चातून आ. वडेट्टीवारांचा भांगडियांवर घणाघाती हल्ला; ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह हजारोंचा जनसैलाब विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : शेतकरी संकटात, तरुण बेरोजगारीच्या खाईत, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आणि कष्टकरी वर्ग सरकारी धोरणांच्या कचाट्यात सापडलेला असताना सत्ताधाऱ्यांना मात्र जनतेच्या प्रश्नांपेक्षा कंत्राटांमध्येच अधिक रस असल्याचा घणाघाती आरोप विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. कंत्राटातून मलिंदा लाटणाऱ्या ठेकेदार आमदाराला जनतेच्या समस्यांची काय जाणीव?, असा थेट सवाल करत त्यांनी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्यावर निशाणा साधला.काँग्रेसच्या वतीने चिमूर येथे काढण्यात आलेल्या जनाक्रोश महामोर्चाने सत्ताधाऱ्यांविरोधातील संतापाला जाहीर व्यासपीठ दिले. शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
न्यायालयाच्या आदेशानंतर सेवानिवृत्त ठाणेदाराविरुद्ध मारहाणीचा गुन्हा बातम्या - Chandrapur

न्यायालयाच्या आदेशानंतर सेवानिवृत्त ठाणेदाराविरुद्ध मारहाणीचा गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपुूर : ट्रॅव्हल्स बसचालकाला रस्त्यात अडवून कथित शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी मोहन शालीकराम अडिवकर ४२ यांच्या तक्रारीनुसार, २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रेल्वे फाटकाजवळ त्यांच्या ट्रॅव्हल्स बसला आंभोरे यांनी अडविले.यावेळी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच वाहतूक पोलिसाकडून लाठी घेऊन डोक्यावर वार केल्याने आपण जखमी झाल्याचे अडिवकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. जखमी अवस्थेत रुग्णालयात जाण्याऐवजी बस चालवत पोलीस ठाण्यात जाण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.घटनेदरम्यान मोबाईलमध्ये असलेले रेकॉर्डिंग व छायाचित्रे डिलीट करण्यात आल्याचा आरोपही अडिवकर यांनी केला आहे. पोलीस ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
  गणेश विसर्जन व्यवस्थेचा महापौरांकडून आढावा बातम्या - Chandrapur

गणेश विसर्जन व्यवस्थेचा महापौरांकडून आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन व्यवस्था सुरळीत, सुरक्षित आणि स्वच्छ राहावी, यासाठी महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांनी १७ सप्टेंबर रोजी शहरातील विविध विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. महापौरांनी रामसेतू लगतचे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड, संजय गांधी मार्केट परिसर, रामाळा तलाव, बाबुपेठ तसेच शहरातील इतर कृत्रिम विसर्जन तलावांना भेट देऊन तेथील व्यवस्था तपासली.यावेळी विसर्जनस्थळांवरील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, विसर्जनाची सुविधा तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था यांची पाहणी करण्यात आली. विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचीही पाहणी करण्यात आली. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जनस्थळी आवश्यक त्या सर्व म...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →