चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
- जुन्या आठवणींना उजाळा; आनंद, संवाद आणि मार्गदर्शनाने रंगला कार्यक्रमविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कामाच्या धावपळीतून वेळ काढत एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशनच्या माजी कार्यकर्त्यांचा आनंद आणि संवाद गेट-टुगेदर उत्साहात पार पडला. तब्बल ३१ वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमेळाव्यात माजी कार्यकर्त्यांनी मनमोकळ्या गप्पा, गाणी आणि विविध खेळांचा आनंद घेतला.दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशनची बल्लारपूर येथे १९९५ मध्ये स्थापना झाली. त्या काळात सिस्टर अलफोंसा यांच्या मार्गदर्शनाखाली १९९५ ते २००६ या कालावधीत अनेकांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात योगदान दिले. संस्थेशी जोडलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पुढे अंगणवाडी सेविका, गटविकास अधिकारी, अभियंता तसेच विविध शासकीय व सामाजिक संस्थांमध्ये अधिकारी पद...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / चंद्रपूर : बांबू ही अतिशय जलद वाढणारी आणि बहुउपयोगी वनस्पती असून पर्यावरण रक्षण, कार्बन शोषण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने तिचे महत्त्व मोठे आहे. पारंपरिक वापरासोबतच बांधकाम, उद्योग आणि विविध मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये बांबूचा वापर वाढत असल्याने भविष्यात बांबू आधारित उद्योगांना मोठा वाव आहे, असे प्रतिपादन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूर वन प्रबोधिनीचे संचालक आर. एम. रामानुजम यांनी केले.Bamboo for the Future – From Tradition to Innovation या संकल्पनेवर आधारित जागतिक बांबू सप्ताह - २०२६ अंतर्गत चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे बांबू प्रदर्शन तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन रामानुजम यांच्या हस्ते झाले.१४ ते १८ सप्टेंबरदरम्यान आयोजित जागतिक बांबू सप्ताहाचा उद्देश बांबूला...
बातम्या -
Chandrapur
- पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते वितरण- अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती प्रक्रियेला गती देत जिल्ह्यातील ४१ अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीची शिफारसपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित विशेष मेळाव्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उमेदवारांना शिफारसपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शासकीय सेवेत असताना...
बातम्या -
Chandrapur
- ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पणविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : घुग्गुस परिसर हा औद्योगिक व खाण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः गरजू रुग्णांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे. नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयातून गरीबातील गरीब रुग्णालाही उत्तम उपचार मिळावेत. प्रत्येक रुग्णाशी सन्मानाने व संवेदनशीलतेने वागून हे रुग्णालय परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.घुग्गुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, घुग्गुसच्या नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख...
बातम्या -
Chandrapur
- पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पण- दोन अत्याधुनिक मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनमुळे शहराच्या सुरक्षेला बळविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिशीलता आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद क्षमता अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दलाला प्राप्त, १४ नवीन वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दोन मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅनदेखील सेवेत दाखल करण्यात आल्या.कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिं...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम आता वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानकाचा मुख्य प्रवेशमार्ग, रस्ते, नाल्या, संरक्षक भिंत, फलाट, प्रवासी निवास, तिकीट कार्यालय, वाहनतळ आणि पादचारी पुलासह विविध कामांना गती देण्यात आली आहे. उर्वरित कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारशाह स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामांना गती मिळाली आहे. मुनगंटीवार यांनी यापूर्वी स्थानकाला भेट देऊन कामांची पाहणी केली होती. कामाची संथ गती लक्षात घेता त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मंड...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह - गोंदिया रेल्वेमार्गावर तळोधी वन परिक्षेत्रातील आलेवाही बीटातील कक्ष क्रमांक ९४ मध्ये अज्ञात रेल्वेच्या धडकेत एका पूर्ण विकसित मादा अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अंदाजे सहा ते आठ वर्षे वयाच्या या अस्वलाचा मृतदेह रेल्वे मार्गालगत काम करणाऱ्या मजुरांना आढळून आला. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली.माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, क्षेत्र सहाय्यक अरविंद माने, वनरक्षक बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वन्यजीव अभ्यासक तथा स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव दल प्रमुख जीवेश सयाम यांच्या उपस्थितीत मृत अस...
बातम्या -
Chandrapur
- ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पणविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : घुग्गुस परिसर हा औद्योगिक व खाण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः गरजू रुग्णांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे. नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयातून गरीबातील गरीब रुग्णालाही उत्तम उपचार मिळावेत. प्रत्येक रुग्णाशी सन्मानाने व संवेदनशीलतेने वागून हे रुग्णालय परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.घुग्गुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, घुग्गुसच्या नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील चिचबोडी येथे घरगुती वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेने चिचबोडी गावासह संपूर्ण सावली तालुक्यात खळबळ उडाली असून, बापलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेत मुखरू कवडू मलोडे (५५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा दिलीप मुखरू मलोडे (३५) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिचबोडी येथील मलोडे कुटुंबात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. शनिवारी सायंकाळी सुमारास सात वाजता बापलेकामध्ये पुन्हा वाद झाला. वाद वाढत गेल्याने संतापलेल्या दिलीपने घरातील कुऱ्हाड उचलून वडील मुखरू यांच्या डोक्यावर आणि मानेवर घातक वार केले. या हल्ल्यात गंभीर द...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर कोर्धा गावाजवळ उभ्या असलेल्या कारला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाले. अपघातात नितीन विनायक भरे (३२) आणि श्रावणी बेदरे (१२) यांचा मृत्यू ,झाला तर हिमेश बेदरे यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले.ही दुर्घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० ते १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील विरली येथील हिमेश बंडू बेदरे हे आपल्या कुटुंबीयांसह बल्लारपूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून बोडेगाव येथे परतताना नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील भोतमांगे ढाब्यावर त्यांनी जेवण केले.जेवण आटोपून बोडेगावकडे जात असताना कोर्धा गावाच्या काही अंतरावर नि...