छत्तीसगड : जवानांची गाडी दरीत कोसळली, ३५ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / बिलासपूर 
: छत्तीसगडमध्ये जवानांची एक गाडी दरीत कोसळली. या अपघातात 35 जण जखमी झाले आहेत. 12 जवान जखमी झाले असून 4 जवानांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जवानांना अंबिकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जवान मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या कार्यक्रमात ड्युटीसाठी जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मैनपाट येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून 38 जवान एका बस मधून मुंगेली येथे जात होते. तेव्हा आमगांव जवळ एका वळणावर बस उलटली आणि दरीत जाऊन कोसळली. ही बस झाडांमध्ये अडकली. उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी जवानांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस चालक अतिशय वेगात गाडी चालवत होता. तेव्हा वळणावर चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघात 35 जण जखमी झाले आहेत. तर 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-10-03
Related Photos