माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई : जळगाव येथील कोट्यवधींची मालमत्ता जप्त


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.  पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत ही वाढ झाली आहे. खडसे यांच्यावर  ईडीने मोठी कारवाई करत मनी लाँडरिंग प्रकरणी लोणावळा, जळगाव येथील जवळपास ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात आहे. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला होता. 
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-27


Related Photos