देशात कोळशाचे संकट नाही : केंद्र सरकारचा दावा


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
देशात अनेक राज्यात कोळश्याअभावी वीज संकटाचा धोका निर्माण झाला आहे. हिंदुस्थानात 135 असे विद्यत केंद्र आहेत, जिथे कोळशातून वीज निर्मिती केली जाते. मात्र आता यातील अर्ध्याहून अधिक औष्णिक विज निर्मिती केंद्रांकडे तीन दिवसही पुरणार नाही इतका कमी कोळसा साठा शिल्लक आहे. हिंदुस्थानात सुमारे 70% वीज पुरवठा कोळशापासून होतो. आता कोळशाच्या कमतरतेवर राज्य सरकारांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे.
जगात चीन नंतर हिंदुस्थानच एक असा देश आहे जो वीज निर्मितीसाठी कोळशाचा सर्वात जास्त वापर करतो. चीनमध्येही कोळशाचे संकट निर्माण झाले आहे आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी तेथे कारखाने आणि शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
हिंदुस्थानबाबत केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी रविवारी असा दावा केला की, 'देशात कोळशाचे संकट न होते, न आहे आणि भविष्यात ही नसणार.' ते म्हणाले आहेत की, 'आमचे अधिकारी दरदिवशी कोळशाच्या साठ्यावर लक्ष ठेवून आहेत. जितक्या पॉवरची आवश्यकता असेल, आम्ही तितका पुरवठा करू. आज आमच्याकडे 4.5 दिवसांचा कोळसा साठा आहे. म्हणून जितक्या कोळशाची आवश्यकता आहे, तितका कोळसा मिळाला नाही. हे सांगणे भ्रामक आहे. तुम्हाला (राज्यांना) जितका हवा तितका कोळसा मिळेल.' असे ते म्हणाले आहेत. मात्र त्यांनी हेही मान्य केले आहे की, आधीप्रमाणे केंद्र सरकारकडे 17 दिवस पुरेल इतका कोळसा साठा राखीव नाही.
केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार जर देशात कोळशाचे संकट नाही, तर औष्णिक वीज प्रकल्प बंद का होत आहेत? महाराष्ट्रात 13 आणि पंजाबमध्ये 7 औष्णिक वीज प्रकल्प आतापर्यंत बंद झाली आहेत. केरळमध्येही काही औष्णिक वीज प्रकल्प बंद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने लोकांना सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वीज वापरण्याचे आवाहन केले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-10-11
Related Photos