चामोर्शीत संत निरंकारी मिशनतर्फे रोगनिदान शिबिर


- तीनशे नागरिकांची आरोग्य तपासणी : मानवसेवा व सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : संत निरंकारी मिशन व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), शाखा चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, चामोर्शी येथे शनिवार,२६ सप्टेंबर रोजी भव्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३०० स्त्री-पुरुष, युवक व बालकांची आरोग्य तपासणी करून उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल इन्चार्ज किशन नागदेवे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना किशन नागदेवे म्हणाले ,तणावमुक्त व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि मानवतेच्या भावनेतून समाजोपयोगी उपक्रम राबविणे हे संत निरंकारी मिशनचे कार्य आहे. मिशनच्या विविध मानवतावादी उपक्रमांची जागतिक पातळीवरील संस्थांनीही दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम अरोरा यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
पौष्टिक व संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.समाजाच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच मानवसेवा, परोपकार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाला शिबिराचे आयोजक अशोक बोरकुटे, खुशाल झोडगे, जीवनकला बोरकुटे, जय श्री वाययलावार, साईनाथ बुरांडे, नामदेव गव्हारे, कान्हुजी गव्हारे, गिरीधर कन्नाके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विद्या बोरकुटे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक भोजराम लंजे यांच्यासह फुलचंद गेडाम, प्रफुल गवारे, निरंजना रामटेके, वंदना ढोडरे, देवनाथ धोडरे, सुरेश बावणे, नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, गिरिधर कन्नाके, घनश्याम बोधलकर, कल्पना सातपुते, सुभाष मिडपल्लीवार, वसंत वासेकर, कोमरू मिडपल्लीवार, तेजराम लंजे, प्रमोद देवगिरकर, आशुतोष कोठारे, शुभम मेक्कलवार आदींनी सहकार्य केले.




Petrol Price




