भंडारा बातम्या
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने व सुसह्य जीवन जगता यावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे तसेच त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, भंडारा येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंडळ (फेसकॉम)चे अध्यक्ष तथा जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य जाधवराव साठवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ ना...
बातम्या -
Bhandara
- प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सजगता, संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करावे. माता-बालमृत्यू रोखण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून तिची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. गर्भवती माता आणि नवजात बालकांना वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय रुग्णालयांतील प्रसूती कक्षांकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात माता व बालमृत्यू प्रतिबंधाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिषा साकोडे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.प्रत्...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्यामार्फत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये युवक-युवतींसाठी रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेशी संबंधित विविध शासकीय योजना व उपक्रमांची जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.या अभियानांतर्गत ३० सप्टेंबर २०२६ रोजी नानाजी जोशी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शहापूर तसेच ग्रामविकास हायस्कूल, कोंडी-जवाहरनगर पेट्रोलपंप, भंडारा येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास कार्यालयाच्या वतीने सुहास बोंदरे, अ.पा.आ.मा.वि.म. जि.स.अधिकारी तसेच अतुल पडोळे, जिल्हा समन्वयक CMYKPY यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थी व युवकांना विविध शासकीय योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.यावेळ...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह साकोली येथे १७ सप्टेंबर २०१६ ते दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.२१ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा (आदिवासी क्रांतीकारकांचे चरित्र व शौर्यगाथा) घेण्यात आली . २२ सप्टेंबर रोजी पी.जी. वासनिक, गृहपाल व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. २३ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय साकोली यांच्या कडुन वसतीगृहात प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच व्यसन मुक्त समाज जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.२४ सप्टेंबर रोजी सकाळी सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योग शिबीर...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित वैनगंगा टेंट सिटी महोत्सव डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मौदी रावणवाडी येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाच्या आयोजनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच महोत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यावर भर देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. महोत्सवाच्या विविध उपक्रमांसाठी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सी.एस.आर. (Corporate Social Responsibility) निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.पर्यटकांच्या...
बातम्या -
Bhandara
- विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी; रक्त तपासणी, समुपदेशनासह सकस आहाराबाबत मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये सेवा संकल्प अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सिकलसेल आणि ॲनिमिया (रक्तक्षय) या आजारांबाबत जनजागृती करण्याबरोबरच विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना सिकलसेल व ॲनिमियासारख्या आजारांची वेळीच माहिती मिळावी आणि आवश्यक उपचार व आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय पथक...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : भारत सरकार, महाराष्ट्र शासन व बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), भंडारा यांच्या वतीने स्वयंरोजगारासाठी इच्छुक युवक-युवतींसाठी वस्त्रचित्रकला व भरतकाम लघुउद्योजक (Embroidery) या विषयावरील ३१ दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाला ५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे.या प्रशिक्षणामध्ये हाताने भरतकामाची ओळख व प्रकार, भरतकामाची साधने, सुया, कापड व धागे, रंगसंगती व डिझाइन निवड, विविध मूलभूत टाके, सजावटीचे व पारंपरिक भरतकाम, मिरर व बीड वर्क, झरदोजी, अप्लिक वर्क तसेच चित्रकला व डिझाइनची मूलतत्त्वे, रंगसिद्धांत, टेक्स्चर, टाय-अँड-डाय, स्टेन्सिल व बटिक प्रिंटिंग आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच बँकिंग सेवा, कर्ज व विविध योजना, मार्केटिंग व्यवस्थापन, खर्च व किंमत ठरविणे,...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : सेवा संकल्प अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, करडी येथे सर्वंकष आरोग्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.प्रशिक्षणादरम्यान नागरिकांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, माता व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, नियमित आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सेवा संकल्प अभियानचा उद्देश, आरोग्य सेवांचे सक्षमीकरण आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्व याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य...
बातम्या -
Bhandara
- ६० आस्थापनांना सुधारणा नोटिसा; ३७ प्रकरणांत २.४७ लाखांचा दंड, एका आस्थापनाचा परवाना निलंबित- जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहे तसेच अन्य अन्न आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची नियमित तपासणी करावी. तपासणीदरम्यान गंभीर स्वरूपाची अस्वच्छता अथवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास विलंब न करता नियमानुसार निलंबन अथवा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभाकक्षात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश ताथोडे, अन्न सुरक्षा अधिकारी उ. मो. चरडे, पु. भी. तुरकर यांच्यासह संबंध...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : भटक्या व विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालय, भंडारा अंतर्गत तीन दिवसीय विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी मौजा मेंढा येथील कहार समाज हॉल तसेच शहापूर येथील ग्रामपंचायत परिसरात विशेष शिबिर घेण्यात आले.मेंढा येथील शिबिराला कहार, बैरागी, लोहार व गोपाळ समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शहापूर येथे ठाण, मुजबी व जवाहरनगर परिसरातील भटकंती करणाऱ्या अहीर व गोपाळ समाजातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.शिबिरामध्ये आधारकार्ड, मतदान कार्ड, आयुष्मान कार्ड, नवीन व अद्ययावत शिधापत्रिका, रहिवासी दाखले, अधिवास दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र तसेच विशेष सहाय्य योजनेंतर्गत श्रावणबाळ,...