भंडारा बातम्या
बातम्या -
Bhandara
- २९ सप्टेंबर रोजी होणारा रोजगार मेळावा पुढील आदेशापर्यंत लांबणीवर; नोंदणी केलेल्या उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक - २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी या रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे नियोजित कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन तारीख स्वतंत्रपणे कळविणार -र...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या वतीने ऑगस्ट २०२६ महिन्यात प्रकल्पस्तरीय विनोबा अॅप – पोस्टर ऑफ द मंथ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून आदिवासी आश्रमशाळांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ होते. यावेळी कार्यालय अधीक्षक सुहास वैरागडे, विनोबा अॅप प्रकल्प अधिकारी निखिल गजभिये, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.ऑगस्ट महिन्यासाठी सुशिल आदिवासी प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, माडगी (टेके.), ता. जि. भंडारा येथील दिलीप बोरकर तसेच आडकुजी चौधरी आदिवासी प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, चांदपूर येथील मीना बिसेन यांची उत्कृष्ट कार्यासाठी ...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : भगवान धन्वंतरी हे आरोग्यशास्त्राचे दैवत मानले जाते. आरोग्य संवर्धन आणि आयुर्वेदाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त सामान्य रुग्णालय, भंडारा येथील आयुष विभागाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यंदाच्या निरोगी उद्यासाठी आयुर्वेद (Ayurveda for a Healthier Tomorrow) या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले.या अभियानांतर्गत विविध रुग्णालयांमध्ये आयुष शिबिरे, योगसत्रे, महालॅबच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी, तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, र...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात कुष्ठरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने बहुविध औषधोपचार (MDT) सुरू करण्यासाठी कुष्ठरोग शोध अभियान (LCDC) २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या १४ दिवसीय अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील जोखमीच्या क्षेत्रांमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील कुष्ठरोगाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अभियानाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.अभियानादरम्यान आरोग्य विभागाची पथके घरोघरी भेट देऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगाबाबत तपासणी करणार आहेत. संशयित रुग्णांचा शोध, घर...
बातम्या -
Bhandara
- भंडारा येथील परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा झाली होती स्थगित; संबंधित उमेदवारांची दुसऱ्या सत्रात फेरपरीक्षाविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार सन २०२६-२७ या वर्षासाठी टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी लाभार्थी निवडीकरिता ऑनलाइन सामायिक चाळणी परीक्षा (CET) घेण्यात येत आहे. मात्र, भंडारा येथील एका परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने स्थगित करण्यात आलेली परीक्षा संबंधित उमेदवारांसाठी २४ सप्टेंबर २०२६ रोजी पुनश्च घेण्यात येणार आहे.नूतन महाराष्ट्र विद्यालय, माधव नगर, भंडारा या परीक्षा केंद्रावर २२ सप्टेंबर २०२६ रोजी तिसऱ्या शिफ्टमध्ये ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्या सत्रातील परीक्...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : गणेश दर्शनासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने भंडाऱ्याचा राजा गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी शासनाच्या विविध योजना व युवकांसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने अविनाश खेडीकर आणि अमित माळवदे यांनी उपस्थित भाविकांना जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजनांची माहिती दिली. युवकांसाठी उपलब्ध असलेले अल्पमुदतीचे तसेच दीर्घमुदतीचे अभ्यासक्रम, विविध कौशल्य प्रशिक्षण सत्रे, प्रशिक्षणासाठी उपलब्ध संधी आणि प्रशिक्ष...
बातम्या -
Bhandara
- श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत आरोग्य तपासणीसोबत शासकीय वैद्यकीय योजनांची माहितीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवाच्या उत्साहात नागरिकांच्या आरोग्यालाही प्राधान्य देत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या श्री गणेशा आरोग्याचा या विशेष अभियानाला भंडारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात ७१८ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये तब्बल ५७ हजार १७८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे नचिकेत बांडेबुचे यांनी ही माहिती दिली.गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग असलेला सार्वजनिक उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री गणेशा आरोग्याच...
बातम्या -
Bhandara
- अनेक महिन्यांच्या मागणीला यश; वेळ व वाहतूक खर्चाची बचतविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : अड्याळ येथील ग्राहकांची अनेक महिन्यांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बंद असलेली घरपोच गॅस सिलिंडर वितरण सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सेवा बंद असल्याने ग्राहकांना गॅस एजन्सीपर्यंत जाऊन सिलिंडर आणावा लागत होता. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच शेतकरी कुटुंबांची मोठी गैरसोय होत होती. शिवाय सिलिंडर आणण्यासाठी अतिरिक्त वाहतूक खर्चही ग्राहकांनाच करावा लागत होता.घरपोच गॅस वितरण सेवा बंद असल्याची बाब लोकमतने वृत्ताद्वारे समोर आणली होती. या वृत्ताची संबंधित यंत्रणेने दखल घेत सेवा पुन्हा सुरू केली. त्यामुळे अड्याळ ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरपोच सेवा सुरू झाल्यामुळे आता गॅस बुकिंग केल्यानंतर सिलिंडर घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ, श्रम आ...
बातम्या -
Bhandara
- २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान मंडळ व तालुकास्तरावर शिबिरे; प्रमाणपत्रांसह शासकीय योजनांचा लाभ देण्यावर भरविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, विविध शासकीय प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येणार आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमात पात्र नागरिकांनी सहभागी होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.या अभियानासाठी महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून विमुक्त जात...
बातम्या -
Bhandara
- संबंधित गावांतील इच्छुक नागरिकांनी दुपारी ४ वाजता उपस्थित राहण्याचे तहसीलदार निलेश कदम यांचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : साकोली तालुक्यातील रिक्त असलेल्या ५ साझांतील महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी मंजूर बिंदुनामावलीनुसार साझातील गावांची एकत्रित लोकसंख्या विचारात घेऊन प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता नवीन इमारत, गडकुंभली रोड, तहसील कार्यालय साकोली येथील सभागृहाच्या वरच्या मजल्यावर निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी, साकोली यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली आहे. रिक्त साझांमध्ये वडेगांव त.सा.क्र.५ अंतर्गत वडेगांव, तुडमापुरी, खांबा, मालुटोला, जांभळी खांबा; परसोडी त.सा.क्र.८ अंतर्गत परसोडी, चारगांव, सुंदरी; सेंदुरवाफा त.सा.क्र.१० अंतर्गत सेंदुरवाफा, सावरगांव (रिठी)...