महत्वाच्या बातम्या

 वेकोलीच्या प्रश्नांवर मुकेश जिवतोडे यांचा पुढाकार


- राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठक; समस्यांवर कार्यवाहीचे वेकोली प्रशासनाला निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा-भद्रावती तालुक्यातील वेकोली क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी पुढाकार घेतला. रविभवन, नागपूर येथे राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत वेकोली प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत माजरी, नागलोन, एकोणा, केपीसीएल, अरविंदो आणि बेलगाव कोळसा खदान क्षेत्रातील समस्यांकडे मुकेश जिवतोडे यांनी राज्यमंत्री जयस्वाल व वेकोली प्रशासनाचे लक्ष वेधले. कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण, शेतपिकांचे नुकसान, स्थानिक युवकांना रोजगार, ओबीच्या ढिगाऱ्यांमुळे पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती, प्रकल्पबाधित गावांचे पुनर्वसन, CSR निधीतून बाधित गावांचा विकास तसेच कोळसा वाहतुकीमुळे खराब होणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न त्यांनी मांडला.

तसेच वेकोली व संबंधित कंत्राटी कंपन्यांमध्ये कार्यरत स्थानिक कामगारांच्या समस्या, कामगारांचे होणारे शोषण व अन्याय याबाबतही जिवतोडे यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. स्थानिक युवक, शेतकरी, प्रकल्पबाधित नागरिक आणि कामगारांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व समस्यांची दखल घेत राज्यमंत्री  ॲड. आशिष जयस्वाल यांनी वेकोली प्रशासनाला संबंधित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच या सर्व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून पुढील उपाययोजना निश्चित करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos