महत्वाच्या बातम्या

 टोमॅटो वाहतूक करणाऱ्या ट्रकची लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडक : दोघे जखमी, एक गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील खेडी फाटा ते गोंडपिंपरी मार्गावर टोमॅटो वाहतूक करणाऱ्या ट्रकने पुढे जाणाऱ्या लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता सावलीपासून पाच किलोमीटर अंतरावर खेडी फाटा परिसरात घडली.

टाटा आयशर क्रमांक सीजी १० बीवाय ५०२६ हा ट्रक बंगळुरूहून टोमॅटो घेऊन बिलासपूरकडे जात होता. दरम्यान, खेडी फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जाणाऱ्या अशोक लेलँड क्रमांक सीजी ०७ बीक्यू ७७३५ या लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली.

अशोक लेलँड ट्रक बल्लारशाह वन कार्यालयातून लाकूड घेऊन गोंडपिंपरी मार्गे रायपूरकडे जात होता. धडकेत आयशर ट्रकमधील पिंकू मरहम साहू २२ वर्षे  हा गंभीर जखमी झाला, तर चालक सत्यसेन उर्फ राज विनोद सोनकर २१ वर्षे याला किरकोळ दुखापत झाली.

जखमींना तातडीने सावली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात आयशर ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी सावली पोलिसांनी चालक सत्यसेन उर्फ राज विनोद सोनकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos