समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : कंटेनरला ट्रकची मागून धडक, ट्रक चालकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : समृद्धी महामार्गावरील पुलगाव डायव्हर्शनजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. लोखंडाचा कच्चा माल घेऊन जालनाकडे निघालेल्या कंटेनरला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीपसिंग मुक्तारसिंग ३५ वर्षे रा. रादलके, पंजाब हे रायगड येथून लोखंडाचा कच्चा माल भरून कंटेनरद्वारे जालनाकडे जात होते. समृद्धी महामार्गावरील पुलगाव डायव्हर्शनजवळ पोहोचताच त्यांच्या कंटेनरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-१२-एव्ही-९१३५ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर मृत ट्रक चालकाची ओळख पटलेली नव्हती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
News - Wardha




Petrol Price




