जाम बसस्थानक परिसरात अवैध दारू वाहतूक करणारी महिला जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला समुद्रपूर पोलिसांनी कारवाई करून अटक केली. जाम बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून आरोपी महिलेकडून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली दारू जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरात्री संजय जाट ५९ वर्षे रा. बेलबाग, जि. मध्यप्रदेश ही महिला जाम बसस्थानक परिसरातून अवैधरीत्या दारूची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर समुद्रपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिची झडती घेतली. झडतीदरम्यान तिच्याकडे अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारी दारू आढळून आली.
पोलिसांनी संबंधित दारूसाठा जप्त करून शिवरात्री संजय जाट हिला अटक केली. तिच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दारूचा साठा कोठून आणण्यात आला होता आणि तो कुठे नेण्यात येत होता, याचा तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.
News - Wardha




Petrol Price




