महत्वाच्या बातम्या

 आरमोरीत पाणीपुरी विक्रेत्याचा तरुणावर ब्लेडने हल्ला


- इंदिरा गांधी चौकातील घटना; सलमान पठाण जखमी, पोलिसांत गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी शहरातील इंदिरा गांधी चौकात पाणीपुरी खाण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर पाणीपुरी विक्रेत्याने ब्लेडने हल्ला केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी घडली. या हल्ल्यात सलमान शब्बीरखान पठाण (३५ वर्ष, रा. बाजारटोली, आरमोरी) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान पठाण हे २५ ऑक्टोबर रोजी आरमोरी येथील इंदिरा गांधी चौकात पाणीपुरी खाण्यासाठी गेले होते. यावेळी पाणीपुरी विक्रेता रतनलाल अहीर याने त्यांना पाणीपुरी देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते. या वादादरम्यान विक्रेत्याने सलमान पठाण यांना धक्का मारून ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत पठाण जखमी झाले.

घटनेनंतर या प्रकरणाची नोंद आरमोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. शहरातील वर्दळीच्या इंदिरा गांधी चौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. किरकोळ कारणावरून वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात होऊ नये, यासाठी नागरिकांनी संयम राखणे आणि वाद शांततेने सोडविणे आवश्यक आहे.





  Print






Related Photos