महत्वाच्या बातम्या

 माजासाठी गेले अन् घरात चोरी : सास्तीत सोन्याचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा प्रतिनिधी : कुटुंबीय नमाज पठणासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे दार उघडून बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून सुमारे २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी राजुरा तालुक्यातील सास्ती वस्ती परिसरात घडली.


ईजाज सुल्तान शेख ५६ वर्ष  रा. सचिन हॉटेलजवळ, सास्ती वस्ती, ता. राजुरा, हे टायर पंचर दुरुस्तीचे काम करतात. दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास शेख हे मुलासोबत घराला बाहेरून दार ओढून नमाज पठणासाठी राजुरा येथील जामा मशिदीत गेले. नमाज पठण करून ते दुपारी सुमारे २ वाजता मुलासह घरी परतले. त्यावेळी घराचे समोरील दार उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाची दोन्ही दारे उघडी असल्याचे तसेच कपाटातील लॉकरही उघडे असल्याचे दिसून आले.

कपाटाची पाहणी केली असता त्यामध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची डबी खाली पडलेली आढळली. पत्नीला बोलावून दागिन्यांची तपासणी केली असता सोन्याचे झुमके, कानातील रिंग, अंगठी, लॉकेट असलेली सोन्याची चैन तसेच नथनी-बेसर आदी दागिने असे सुमारे २० ग्रॅम चोरी गेले. नमाजासाठी गेलेल्या अवघ्या एका तासाच्या कालावधीत घरात शिरून चोरट्याने कपाटातील दागिने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ईजाज शेख यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांत तोंडी रिपोर्ट दिला असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.





  Print






Related Photos