गणेश चर्तुर्थी निमीत्त स्वच्छ व हरीत गाव समितीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : स्वच्छ व हरीत गावं सामिती गणेशपुर (भंडारा) च्या वतीने गणेशपुर येथील नेहरू वार्डमध्ये गणेश चतुर्थीच्या पर्वावर १४/०९/२०२६ ला यावेळी जि.प. सदस्य यशवंत सोनकुसरे तसेच माजी न्यायाधीश मा. महेंद्र गोस्वामी यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छ व हरीत गाव समिती गगणेशापुरच्या वतीने यावर्षी १०० झांडाचे रोपण करण्यात आलेले असुन सन २०२५ मध्ये सुध्दा समितीव्दारे १२५ वृक्षाची लागवड करण्यात आली त्यापैकी ११५ झाडे जिवंत असून त्यांची उत्तम प्रकारे काळजी समितीच्या वतीने घेतली जात आहे.
या समितीच्या सदर कार्याची दखल सामाजिक वनीकरण विभागाने घेतलेली असुन विभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवुन वृक्ष लागवडीची माहिती घेतली व सहकार्याचे आश्वासन दिले. सर्व वृक्षांच्या सरंक्षणासाठी विविध मान्यवरांकडुन देणगीव्दारे कठडयांची सोय करण्यात आली. त्यामुळे जिवीत वृक्षांची संख्या वाढविण्यात समिती यशस्वी होत आहे. २६/०८/२०२६ ला परीसरातील वैद्यकिय चिकीत्सकांनी समितीला कठडे भेट दिली.
या कार्याच्या यशस्वीततेसाठी समितीचे पदाधिकारी व ग्रा. प. सदस्य बबाबुरावजी वैद्य, पांडुरंगजी माथुरकर, अरविंद गुप्ता, डॉ. महेंद्र गणाविर, गुलाबराव पडोळे, विजय रोकडे, बेनीप्रसाद व्यास, खेमराज भुरे, विकास धरमसहारे, गंगाधर रामटेके, बळीराम रांगोळे, भिमराव मेश्राम, बी. भास्करन, प्रभातकुमार गुहेरा, हरीभाऊ माळी इत्यादीचे मोलाचे सहकार्य लाभले.




Petrol Price




