गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तात्काळ वैद्यकीय स्थलांतर

- वैद्यकीय उपचारांकरिता भामरागड येथून हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने करण्यात आले स्थलांतर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सविस्तर वृत्त असे आहे की, मागील काही दिवसांपासून जिल्ह्राभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पुर परिस्थीती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्रातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
अशातच आज ३१ जुलै २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्रातील उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी, ३५ वर्ष यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंश सर्पदंश कारणाने गंभीर झाल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तात्काळ हालचाल करुन त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारसाठी तातडीने गडचिरोलीला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीवरून शामसुंदर नरोटी यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता, गडचिरोली पोलीसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले होते. शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे.
पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी भामरागड परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, आपत्कालीन परिस्थीतीत कुठल्याही अंधश्रध्देला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करुन वेळेत उपचार मिळवावे.
सदर कार्यवाही ही गडचिरोली पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोस्टे भामरागड येथील अधिकारी व कर्मचारी, भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी, पवन हंस पायलट अरविंद सैनी, राजीव शर्मा यांच्या सहकार्याने पार पाडली.
News - Gadchiroli




Petrol Price




