आदिवासी आश्रमशाळांमध्ये आज शाळा प्रवेशोत्सव : शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे होणार स्वागत


- विद्यार्थी, पालकांना सहभागी होण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत कार्यरत २ शासकीय आश्रमशाळा व ५ अनुदानित आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक सत्राच्या प्रारंभानिमित्त ३० जून रोजी शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या तसेच माजी विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात येणार असून विविध शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेशोत्सवानिमित्त प्रभातफेरी, गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार, पालक मेळावा, पाठपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वितरण, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच विविध योजनांची माहिती, जेईई, नीट प्रवेशपूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्राबाबत जनजागृती ईत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शासकीय आश्रमशाळा पांढुर्णा येथे प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम व शासकीय आश्रमशाळा हिरापूर येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीजा उईके या पालक अधिकारी म्हणुन उपस्थित राहणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




