मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाच्या ०४ ऑगस्ट २०२६ च्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर केला असुन तो पुढीलप्रमाणे आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी- ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण/पुनर्रचना-१७ ऑगस्ट २०२६, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- २४ ऑगस्ट २०२६, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- २४ ऑगस्ट २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६, नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे-२४ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६, अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी- २७ ऑक्टोबर २०२६ असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली राहूल जाधव यांनी कळविले आहे.




Petrol Price




