महत्वाच्या बातम्या

 आगरगाव येथे पारधी व कोलाम समाजासाठी विशेष सेवा शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सेवा सप्ताह अंतर्गत देवळी तालुक्यातील आगरगाव येथे पारधी व कोलाम समाजातील नागरिकांसाठी विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचा मुख्य उद्देश पारधी व कोलाम समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि शासकीय सेवा पोहोचविणे हा आहे. समाजातील नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे, विविध योजनांची माहिती तसेच योजनांचा लाभ मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा आणि नागरिकांना शासकीय कामांसाठी अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने अशा विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.





  Print






Related Photos