महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१२ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१९०५ : नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

१९१८ : ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

१९२७ : सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

१९३० : पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९४५ : पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.

१९५६ : मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९० : टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.

१९९७ : १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.

१९९८ : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.

२००० : १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२००० : भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

२००३ : शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

१२ नोव्हेंबर जन्म

१८१७ : बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १८९२ – आक्रा, इस्त्राएल)

१८६६ : चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष सन यट-सेन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९२५)

१८८० : सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा पारनेर, जि.अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

१८८९ : रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)

१८९६ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८७)

१९०४ : समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल १९८९)

१९४० : हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९९२ – मुंबई)

१९६३ : भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट ऑस्टॅथिओस पॅथ्रोस यांचा जन्म (मृत्यू : २० ऑगस्ट २०२२)

१९६१ : रोमानियन जिम्नॅस्ट, ओलम्पिक जिम्नॅस्टिक मध्ये पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती नादिया कोमानेसी यांचा जन्म

१९४७ : भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक नीरद महापात्रा यांचा जन्म (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०१५)

१९३४ : भारतीय बालरोगतज्ञ दिलीप महालानाबिस यांचा जन्म (मृत्यू : १६ ऑक्टोबर २०२२)

१६०६ : फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका जीन मॅन्स यांचा जन्म (मृत्यू : १८ जून १६७३)

१२ नोव्हेंबर मृत्यू

१९४६ : बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८६१)

१९५९ : अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

१९५९ : स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८६)

१९९७ : वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे पुणे येथे निधन.

२००५ : रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९२४)

२००७ : भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१९)

२०१४ : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९४६)

२०२० : भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचे निधन (जन्म: २७ जुलै १९६७)

१९६५ : भारतीय धर्मगुरू, ५१वे दाई अल-मुतलक ताहेर सैफुद्दीन यांचे निधन (जन्म: ४ ऑगस्ट १८८८)

१८५७ : उरुग्वे देशाचे ४थे राष्ट्राध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी मॅन्युएल ओरिबे यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १७९२)





  Print






Related Photos