एसआयआर-२०२६ अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


- जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १७, १८, २४ व २५ ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पात्र नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार यादीत पात्र नागरिकांचा समावेश व्हावा, तसेच प्रारूप मतदार यादीतील त्रुटी दूर करता याव्यात, या उद्देशाने शनिवार, १७ ऑक्टोबर, रविवार, १८ ऑक्टोबर, शनिवार,२४ ऑक्टोबर आणि रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांमध्ये पात्र नागरिकांना मतदार यादीत नवीन नाव नोंदविणे, विद्यमान नोंदीतील तपशील दुरुस्त करणे तसेच आवश्यकतेनुसार दावे व हरकती दाखल करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. याशिवाय, भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा संकेतस्थळावरूनही ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
पात्र नागरिकांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन -
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. नाव नोंदणी करावयाची असल्यास किंवा मतदार यादीतील नोंदीबाबत दुरुस्ती अथवा हरकत असल्यास विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा. कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आवश्यक दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आ




Petrol Price




