कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवरील चाचणी दिल्लीच्या 'एम्स' रुग्णालयात यशस्वी


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / दिल्ली :
कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवरील चाचणी दिल्लीच्या 'एम्स' रुग्णालयात यशस्वी झाली आहे. 2 ते 18 वयोगटातील मुलांवर ही चाचणी करण्यात आली होती. लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत असतानाच एम्समधून ही खुशखबर आली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि प्रौढांचे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 70 कोटी नागरिकांनी लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापुढे लहान मुलांच्या लसीकरणाचे आव्हान पार पाडावे लागणार आहे. केंद्रीय औषध नियंत्रकांच्या परवानगीनंतर 7 जूनपासून कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. नाकावाटे दिल्या जाणाऱया भारत बायोटेकच्याच 'बीबीव्ही 154' या नोजल व्हॅक्सिनचीही मानवी चाचणी देशात सुरू आहे. 18 ते 60 वयोगटातील स्वयंसेवकांवर करण्यात आलेली पहिली चाचणी यशस्वी झाली असून आता दुसऱ्या टप्प्यातील निकालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर तिसरी चाचणीही यशस्वी झाल्यावर ही लस प्रत्यक्ष वापरता येणार आहे. ही लस नाकाच्या आतील भागात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस 'निपाह' विषाणूवरही प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ यांनी संयुक्तपणे ही चाचणी केली होती. आठ माकडांवर ही चाचणी केली गेली. त्यातील चार माकडांना कोव्हिशिल्ड समतुल्य लस टोचण्यात आली आणि नंतर आठही माकडांना घशातून तर काहींना नाकातून निपाह विषाणू देण्यात आला. 14 दिवसांनंतर त्यांची तपासणी केली गेली तेव्हा लस दिलेल्या माकडांमध्ये निपाह विषाणूची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.  Print


News - World | Posted : 2021-09-10
Related Photos