महत्वाच्या बातम्या

 जि.प. प्राथमिक शाळा मुधोली येथे शाळा व्यवस्थापन समिती गठित.


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती चामोर्शी केंद्र गणपूर (रै) अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली तुकूम येथे शैक्षणिक वर्षासाठी नव्याने शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक विकासासोबतच विद्याथ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मनोज नानाजी झाडे तर उपाध्यक्षपदी  प्रियंका अतुल डाकोटे  यांची निवड करण्यात आली आहे. समितीमध्ये पालक सदस्य म्हणून मिथुन भाऊजी सरपे शालू साईनाथ सरपे शिल्पा मधुकर झाडे,अशोक डोनोजी गेडाम,अरविंद गणपती तिमाडे शारदा आनंदराव सरपे मनीषा साईनाथ कोसमशिले यांची निवड करण्यात आली.

विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून समृद्धी ऋषी घोगरे, पवन विकास शेडमाके यांची निवड तर दिलीप हनुमंत वर्धलवार यांची ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे तर स्थानिक शिक्षण प्रेमी म्हणून रजित बाबुराव नागापुरे यांची निवड करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक संतोष रामराव नागरगोजे हे शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती व प्रगती याकडे लक्ष देणे, शालेय परिसर स्वच्छत सुंदर ठेवणे, पालक व प्रामस्थांचा शाळेच्या विकासातील सहभाग वाढविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांना चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे.

शाळा व्यवस्थापन समिती ही शाळा आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, समितीव्या माध्यमातून शाळेच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





  Print






Related Photos