हर्षद गंधेवार यांची गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या अधिसभेवर चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा येथील मुख्य लिपिक हर्षद गंधेवार यांचे सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार हे नामनिर्देशन करण्यात आले असून, विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयाकडून ९ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी करण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेंखन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्राद्वारे गंधेवार यांच्या अधिसभेवरील नामनिर्देशनाची माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाच्या कार्यात त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा उपयोग होईल, अशी अपेक्षाही विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हर्षद गंधेवार हे चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा येथे मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयीन प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विद्यापीठाच्या अधिसभेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या माध्यमातून विद्यापीठाशी संबंधित विविध प्रशासकीय व शैक्षणिक विषयांवर काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. चिंतामणी महाविद्यालयाचे संस्थाचालक व सिनेट सदस्य स्वप्नील दोंतुलवर, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




Petrol Price




