महत्वाच्या बातम्या

 श्री गणेशा आरोग्याचा २०२६ अभियानांतर्गत लाखांदूर येथे मोफत आरोग्य शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने श्री गणेशा आरोग्याचा २०२६ अंतर्गत लाखांदूर तालुक्यातील दहेगाव रोड येथील सर्वधर्म गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुष्का मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना वैद्यकीय सल्ला व आवश्यक उपचारही देण्यात आले. तसेच विविध आरोग्यविषयक तपासण्या करून नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात अधिपरिचारिका  प्रगती निंबार्ते आणि फ्लॅबोटॉमिस्ट काजल शहारे यांनी रुग्णांच्या विविध तपासण्या तसेच रक्त नमुने संकलित  केले. गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वधर्म गणेश उत्सव मंडळाच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविका वैशाली बोरकर,  जिजा भुते आणि मंगला भुरले यांनी विशेष सहकार्य केले.





  Print






Related Photos