महत्वाच्या बातम्या

 मूलभूत पायाभूत सुविधांच्या अत्याधुनिकीकरणावर भर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


- उप्पलवाडी इंडस्ट्रियल एस्टेटची संयुक्त पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : उप्पलवाडी इंडस्ट्रियल एस्टेट येथील प्रलंबित समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी व पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या क्षेत्राची आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. नितीन राऊत उपस्थित होते.


येथील उद्योगांचे वाढते  प्रमाण बघता या क्षेत्रातील जुन्या पायाभूत सुविधांचा व्यापक स्तरावर कायापालट करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. औद्योगिक परिसराच्या विकासासाठी स्थानिक उद्योजकांनी  मुख्य समस्या व गरजा प्रशासनासमोर मांडल्या. कच्च्या व पक्क्या मालाच्या वाहतुकीसाठी संपूर्ण क्षेत्राचे तांत्रिक सर्वेक्षण करून रस्त्यांचे मजबूतीकरण व पुनर्रचना करणे, पावसाळ्यातील पाणीसाठ्याची समस्या सोडवण्यासाठी ड्रेनेज व सीवर लाईन उभारणे, उद्योगांसाठी पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आणि रात्रंदिवस चालणाऱ्या कामांच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात आधुनिक पथदिवे लावणे या मुख्य मागण्यांचा यात समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या परिसराचे सर्वेक्षण करून वेळेत अहवाल सादर करण्याच्या सूचना कुमार आशीर्वाद यांनी केल्या. यावेळी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 





  Print






Related Photos