महत्वाच्या बातम्या

 नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  : मेरा युवा भारत, नागपूर युवा कार्यक्रम तसेच केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत ६ ऑगस्ट रोजी बिंझानी नगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात युवकांसाठी नशामुक्तीविषयक उपक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन डॉ. पिसे यांनी  यावेळी केले.  नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत पुढील दोन वर्षांत नागपूर विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात दर रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या उपक्रमांतर्गत चित्रकला, वादविवाद, नृत्य, संगीत, लोकगीत, पथनाट्य, कविता, लघुपट तसेच घोषवाक्य लेखन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित मेत्रे अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून मेरा युवा भारतचे माजी उपनिदेशक शरद साळुंके आणि धनवटे नॅशनल कॉलेजचे डॉ. नितीन कराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेरा युवा भारतचे उपनिदेशक सौरभकुमार निषाद यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात डॉ. सुजित मेत्रे यांनी युवकांनी नशेपासून दूर राहून व्यसनमुक्त भारत घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले. या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविणारे स्पर्धक राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राम फरताडे यांनी केले, तर आभार मानले. यावेळी लेखाधिकारी संजय राऊत, कार्यक्रम अधिकारी रमेश अहिरकर तसेच कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos