गडचिरोली जिल्ह्यातील विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) समन्वय समितीची बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने राज्यभर विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान (SIR - Special Intensive Revision) राबविण्याची घोषणा केली आहे. या अभियानाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा SIR समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच आगामी कार्ययोजना, जनजागृती अभियान आणि बूथस्तरावरील नियोजनावर चर्चा करण्यात आली. मतदार यादीतील पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे आणि प्रत्येक मतदारापर्यंत अभियानाची माहिती पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहिम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मतदार यादी ही लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बूथ स्तरावर जाऊन SIR अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. पात्र मतदारांचे नाव यादीत समाविष्ट होण्यासाठी आणि कोणताही मतदार वंचित राहू नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद लेनगुरे, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक तथा गटनेता सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरघंटीवार, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, अहेरी तालुका अधक्ष पप्पू हकीम, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, खुलीअनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, ज्येष्ठ नेते निकेश गद्देवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विवेक घोंगडे, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, अभिजीत घाईत, माधुरी मडावी, रिता गोवर्धन, शालिनी पेंदाम, तारा गावडे, बेबी हेड्रो, शहराध्यक्ष विलास चीजगरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हेमंत कोवासे, ओम प्रकाश चौधरी, लोकेश पोटावी, आशिष घेर, संजय बुरांडे, सचिन गावडे, परमेश्वर गावडे, सुधाकर गोटा, संजय शेडमाके, गणेश झोरे, संजय बुरांडे, सचिन गावकर, निकेतन कोरेटी, सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




