महत्वाच्या बातम्या

 लायड्स मेटल्सचा मदतीचा हात : इतर सामाजिक संस्थांसाठीही आदर्श ठरली संवेदनशीलता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भामरागड तालुक्यात ३० जुलै ते १ ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक साहित्य पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंबांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून पंचनामे व मदत प्रक्रियेचे काम सुरू असतानाच संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुरजागड येथील लायड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड कंपनीने दाखविलेली तत्परता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

पूरग्रस्तांना तात्पुरती मदत मिळावी, या उद्देशाने कंपनीचे पथकाने मदत साहित्य भामरागड तहसील कार्यालयात पोहोचविले. तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी रायल तलांडे, महसूल कर्मचारी, कोतवाल व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, किराणा, अन्नधान्याचे किट वितरित करण्यात आले.

आपत्तीच्या काळात तात्काळ मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे लायड्स मेटल्स एनर्जी लिमिटेडने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. कंपनीच्या या संवेदनशील उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनी कंपनीचे मनापासून कौतुक केले आहे. दुर्गम व आपत्तीग्रस्त भागात शासनाच्या मदतीबरोबरच उद्योगसमूह, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, व्यापारी व दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

लायड्स मेटल्सने घालून दिलेल्या या आदर्शाचे अनुकरण करत अधिकाधिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्यास अनेक कुटुंबांना नव्याने उभे राहण्याचे बळ मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लायड्स मेटल्स एनर्जी लिमिटेडने संकटाच्या काळात दाखविलेली सामाजिक संवेदनशीलता ही केवळ मदतीपुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण ठरली आहे. या उपक्रमामुळे इतर उद्योग, सामाजिक संस्था व सेवाभावी संघटनांनाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos