सोशल मीडियावर प्रेमाचा रक्तरंजित शेवट : लग्न नाकारल्यावर मित्राचा गळा चिरून खून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / एटापल्ली (गडचिरोली) : सोशल मीडियावरून सुरू झालेली ओळख थेट खुनात बदलली. रविवारी, ३१ मे रोजी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास एटापल्ली-जारावंडी मार्गावर ही धक्कादायक घटना घडली.
मृतक सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (वय ३२, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) याचा नागेपल्ली येथे गॅरेज व्यवसाय आहे. आरोपी सुरज हलदार (वय ३०, रा. मिरगन, ता. रायघर, जि. नबरंगपूर, ओडिशा) याने आपल्यासोबत आणलेला चाकू काढून सतीशकुमारच्या गळ्यावर सपासप वार केले आणि खून केला.
माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. मैत्रीतून ही ओळख पुढे समलैंगिक जवळीकपर्यंत पोहोचली. सूरजने सतीशकुमारकडे लग्नासाठी तगादा केला, परंतु मृतक आधीच विवाहित असल्यामुळे नकार दिला.
घटनेच्या दिवशी सूरज ओडिशाला परत जात होता, सतीशकुमार त्याला कारने सोडत होता. देवदा गावाजवळ वाद वाढल्यावर सूरजने नियोजित पद्धतीने चाकू काढून सतीशकुमारवर हल्ला केला.
परिसरातील नागरिकांनी धाव घेत आरोपीला पळण्यापूर्वी पकडले आणि पोलिसांना दिले. सध्या आरोपीवर एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, हालेवारा पोलिस तपास करत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




