महत्वाच्या बातम्या

 भाजपा जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा उत्साहात समारोप : संघटन मजबुतीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान’ अंतर्गत जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समारोपीय सत्रात भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओजस्वी भाषणातून त्यांनी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेत पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली.

पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळापर्यंत पोहोचून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग संघटन विस्तारासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होत असून पक्ष अधिक सक्षमपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी तसेच माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षण वर्गाच्या समारोपानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos