आजचे दिनविशेष


१९ मे महत्वाच्या घटना
१५३६ : इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांची बायको अॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
१७४३ : जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
१९१० : हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
१९११ : पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
१९६३ : द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.
२०१८ : प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचे लग्न सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर येथे झाले.
२००० : स्पेस शटल प्रोग्राम - अमेरिकेने स्पेस शटल अटलांटिस यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पुन्हा सामान पुरवण्यासाठी STS-101 मिशनवर प्रक्षेपित केले.
२००० : स्पेस शटल प्रोग्राम - अमेरिकेने स्पेस शटल अटलांटिस यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पुन्हा सामान पुरवण्यासाठी STS-101 मिशनवर प्रक्षेपित केले.
१९९६ : स्पेस शटल प्रोग्राम - अमेरिकेने स्पेस शटल एंडेव्हर यान मिशन STS-77 साठी प्रक्षेपित केले.
१९७१ : मार्स प्रोब प्रोग्राम - सोव्हिएत युनियनने मार्स २ अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
१९६१ : बंगाली भाषा चळवळ - बंगाली भाषेला राज्य मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या सिलचर रेल्वे स्टेशन, आसाम येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ लोकांचे निधन.
१९ मे जन्म
१८८१ : तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)
१८९० : व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)
१९०५ : भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)
१९०८ : भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५६)
१९१० : नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)
१९१३ : भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९६ – बंगळुरू)
१९२५ : ख्मेर रुज चे नेते पॉल पॉट यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९८)
१९२५ : कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९६५)
१९२६ : आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म.
१९२८ : लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८२)
१९३४ : भारतीय लेखक आणि कवीरस्किन बाँड यांचा जन्म.
१९३८ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म.
१९६४ : तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)
१९७४ : भारतीय अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म
१९१४ : ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक मॅक्स पेरुत्झ यांचा जन्म (मृत्यू : ६ फेब्रुवारी २००२)
१८९६ : वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला हुल्डा क्रुक्स यांचा जन्म (मृत्यू : २३ नोव्हेंबर १९९७)
१८७९ : संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला नॅन्सी एस्टर यांचा जन्म (मृत्यू : २ मे १९६४)
१९ मे मृत्यू
१२९७ : संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.
१९०४ : आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८३९)
१९५८ : औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे
१९५८ : इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचे निधन (जन्म: १० डिसेंबर १८७०)
१९६५ : मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
१९६९ : इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.
१९९५ : ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.
१९९७ : बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
१९९९ : काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन.
२००८ : नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२८ – कोल्हापूर, महाराष्ट्र)
२००९ : अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक रॉबर्ट एफ. फर्चगॉट यांचे निधन (जन्म: ४ जून १९१६)
२००४ : केरळचे ९वे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचे निधन (जन्म: ९ डिसेंबर १९१९)
१९५२ : भारतीय कर्नाटक गायिका बंगलोर नगरनाथम्मा यांचे निधन (जन्म: ३ नोव्हेंबर १८७८)
१९०९ : दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचे निधन (जन्म: १७ सप्टेंबर १८९१)
News - todayspecialdays




Petrol Price




