चामोर्शीत घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : घरातून अचानक बेपत्ता झालेल्या ३२ वर्षीय अजय सुनील कानकुटलावार याचा मृतदेह आज घराजवळील विहिरीत पाण्यावर तरंगत आढळला. अजय रा. चामोर्शीचा रहिवासी असून अविवाहित होता.
अजय १९ मे रोजी घरातून निघाल्यानंतर परत आला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी शोध घेतला असता, दोन दिवस काही ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर २१ मे रोजी त्याचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला. मृतदेह आढळल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला, नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू नोंदवला आहे. अद्याप स्पष्ट नाही की, अजयने आत्महत्या केली की तो विहिरीत पडून मृत्यू झाला.
सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आई आणि भावाने आपला एकच आक्रोश व्यक्त केला, ज्यामुळे वातावरण अत्यंत सुन्न झाले. अजयचे वडील याआधीच निधन झालेले आहेत आणि पश्चात केवळ आई व भाऊ असा परिवार आहे. अविवाहित अजय कानकुटलावार याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




