नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने ६ कामगार जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नाशिक :
जिल्ह्यातील कुमावतनगरमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटाने ६ कामगार जखमी झाले आहे. या घटनेने नाशिक हादरले आहे.
स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करताना काडीपेटी पेटवल्यावर गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात ६ कामगार भाजले आहेत. यातील दोन कामगार ९० टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सहा कामगार कुमावतनगरमध्ये एकत्रित राहत होते. हे सर्व कामगार परराज्यातले असून टाइल्स बसवण्याचे काम करतात. काल शुक्रवारी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करत होते. त्यावेळी त्यांच्यातल्या एकाने काडीपेटीची काडी पेटवली. त्याचवेळी गॅस सिलिंडरचा भडका उडला आणि मोठा स्फोट झाला. हा स्फोट होताच संपूर्ण परिसर हादरून गेला.
या स्फोटात लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, वीरेंद्रकुमार (सर्व रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यातले दोघे कामगार ९० टक्के भाजलेत. या स्फोटाप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-10-23
Related Photos