दारूमुळे होऊ शकतो सात प्रकारच्या कर्करोगांचा धोका : डब्लूएचओचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : दारूच्या सेवनावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. त्यात अनेक वेगवेगळे दावे केले गेले आहेत. पण, जागतिक आरोग्य संघटना डब्लूएचओने याच दारूविषयी एक गंभीर इशारा दिला आहे. दारूच्या पहिल्या थेंबापासून कर्करोगाचा धोका सुरू होतो तसंच, सात वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांचा धोकाही दारूच्या सेवनाने भेडसावतो, असा इशारा डब्लूएचओने दिला आहे.
डब्लूएचओने काही दिवसांपूर्वी द लान्सेट पब्लिक हेल्थ नावाच्या जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, दारूचे एक निश्चित प्रमाण कधीही ठरलेले नसते, ज्यामुळे हे निश्चित होईल की दारू आरोग्यासाठी चांगली आहे. अल्कोहोलच्या सेवनाने कमीत कमी सात प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.
यात तोंडाचा, गळ्याचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, स्तनांचा आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा समावेश आहे. दारू शरीराचे खूप नुकसान करते. कर्करोगजन्य पदार्थांमध्ये अल्कोहोलचा समावेश करण्यात आला आहे. युरोपीय देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अल्कोहोलच्या सेवनामुळेच वाढले आहे, असा दावाही डब्लूएचओने केला आहे.
अल्कोहोलमधील इथेनॉल हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो. तसेच, दारू किती महागडी किंवा किती कमी प्यायली जाते, याच्याशी त्याचा अजिबात संबंध नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
News - Rajy