मतदार यादी पुनरीक्षण कामाचा आढावा घेण्यासाठी मतदार यादी निरीक्षक ४ सप्टेंबरला जिल्ह्यात


- लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांची बैठक आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारुप मतदार यादीवरील दावे व हरकतींच्या कालावधीत मतदार यादीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक ४ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.
राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नुकतीच दिनांक ३१ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीवरील आक्षेप व हरकतींच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक वर्धा जिल्ह्याला एकूण तीन भेटी देणार आहेत. यापार्श्वभूमीवर पहिली भेट दिनांक ४ सप्टेंबर रोजी देणार असून जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथील सभागृह क्र. २ मध्ये दुपारी १२.३० वाजता लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी वर्धा जिल्ह्यातील विद्यमान लोकप्रतिनिधी तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पारदर्शक आणि अचूक व्हावे या दृष्टीने या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत यांनी कळविले आहे.




Petrol Price




