महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपसाठी चंद्रपूरचा संघ सज्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : २६ व्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपसाठी चंद्रपूर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. आयुषी स्पोर्ट्स अकॅडमी, चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १४, १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, भद्रावती येथे ९ वे जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स कॅम्प व एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यात आली.

शिबिरादरम्यान आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शक अमेया जोशी, हर्षल मोगरे, गौरव जोगदंड आणि सिद्धार्थ कदम यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना एरोबिक्स जिम्नॅस्टिक्समधील तांत्रिक कौशल्य, शिस्त आणि स्पर्धात्मक तयारीबाबत मार्गदर्शन मिळाले.

महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे तसेच सचिव डॉ. मकरंद जोशी यांच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हा संघ निवडीची प्रक्रिया पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दीक्षांत दुर्गराज रामटेके, दीक्षांत महेंद्र सोनारकर, अर्णव बाबा कोटनाके, त्रिशा योगेश रामटेके, त्रिशा सतीश कवाडे, विजयालक्ष्मी गोपी, कृतिका विकी बघेल, अनन्या रवी भोयर, पुनम चव्हाण, दिक्षा दूधकुवर, ज्ञानेश्वर जुमडे आणि आकाश भिस्ते या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.


MAGAचे कार्यकारी सदस्य व जज, तसेच चंद्रपूर जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे संस्थापक आणि आयुषी स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक दुर्गराज रामटेके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघाची निवड करण्यात आली. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हा असोसिएशनच्या अध्यक्षा शीतल रामटेके, निलेश गुंडावार, ॲड. राजरत्न पथाडे, आशुतोष गायनेवार, अशोक कामडे, संजय माटे, करण डोंगरे, बी. एल. करमणकर, आयुषी रामटेके, राकेश राय, गौतम भगत, सतीश कवाडे, कृष्णा रामटेके तसेच आयुषी स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. निवड झालेल्या खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





  Print






Related Photos