महत्वाच्या बातम्या

 चोरीचे कॉपर केबल खरेदी करणारा बल्लारपूरचा भंगार व्यावसायिक एलसीबीच्या जाळ्यात : दोघांसह तिघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गौरी खदान येथून चोरी करण्यात आलेल्या कॉपर केबल प्रकरणात चोरीचा माल खरेदी करणाऱ्या बल्लारपूरच्या भंगार व्यावसायिकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. इलियास अहमद खान ३७ वर्षे रा. गणपती वॉर्ड, बल्लारपूर असे अटक करण्यात आलेल्या भंगार व्यावसायिकाचे नाव असून, त्याच्यासह अन्य दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत १५ हजार रुपये किमतीची चोरीची कॉपर केबल जप्त करण्यात आली.

राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी खदान परिसरातून कॉपर केबल वायर चोरी झाल्याप्रकरणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ८२६/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या राजुरा उपविभागीय पथकाने समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान बल्लारपूर येथील भंगार व्यावसायिक आरोपी इलियास अहमद खान याच्यासह आरोपी अमन हरिश्चंद्र केसकर १९ वर्षे रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर आणि आरोपी अतिश बालाजी पवनकर २१ वर्षे रा. सास्ती, ता. राजुरा यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल वायर जप्त करण्यात आली.

या प्रकरणातील आरोपी अंकित दुम्पाला रा. सास्ती, राहुल निषाद रा. भगतसिंग वॉर्ड, बल्लारपूर आणि अंकित सिंग रा. सास्ती हे तिघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी राजुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या राजुरा उपविभागीय पथकाने केली.





  Print






Related Photos