डेल्टा प्लसच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ : रायगडमध्ये २ रूग्णांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात डेल्टा प्लसने कहरच केला आहे. डेल्टा प्लसच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय. त्यातच आता राज्यात मृत्यूचा आकडा थेट 4 वर जाऊन पोहोचलाय. रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लसमुळे दोन जणांना मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यात अजूनच चिंता वाढली आहे.
नुकतेच मुंबईत एका 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याची माहिती होती. त्यातच आता रायगडमधील नागोठणे आणि उरणमध्ये 1-1 रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात डेल्टा प्लसमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 4 वर गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईत बुधवारी एकाच दिवशी डेल्टा प्लस बाधित ७ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आणखीन वाढली आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेने करोनावरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. 
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-13


Related Photos