महत्वाच्या बातम्या

 २ नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर महिन्याचा पहिला सोमवार २ तारखेला येत असल्यामुळे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदार यांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.

लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज १५ दिवस आधी २ प्रतीत सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी डी.एस.कुंभार यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos