गोरेगाव तालुक्यातील ४० वर्षीय युवकाने केले विष प्राशन


- राजेश पंधरे यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू; शहर पोलिसांत नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम पिपरटोला (निंबा) येथील ४० वर्षीय युवकाने विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. राजेश सुखराम पंधरे (वय ४०, रा. पिपरटोला (निंबा), ता. गोरेगाव, जि. गोंदिया) असे या युवकाचे नाव आहे. सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी २:३० वाजताच्या सुमारास त्याला उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सुखराम पंधरे याने विष प्राशन केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असून, सध्या त्याची प्रकृती आणि उपचारांबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. युवकाने विष प्राशन करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.




Petrol Price




