महत्वाच्या बातम्या

 लोकशाहीच्या रक्षणासाठी चंद्रपुरात काँग्रेसचे जन आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासह मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार लोकतंत्र बचाओ सप्ताह अंतर्गत वोट बचाओ–देश बचाओ या घोषवाक्याखाली चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीने जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता गांधी चौक येथे हे आंदोलन होणार आहे.

मतदारांच्या अधिकारांची जपणूक, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि संविधानिक व्यवस्थेच्या संवर्धनाचा मुद्दा या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विविध आघाड्या, सेल, विभाग तसेच जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत.

या जनआंदोलनात प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, विभाग व सेलचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले आहे.

लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आयोजित या आंदोलनात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. गांधी चौकात होणाऱ्या या जनआंदोलनातून लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.





  Print






Related Photos