महत्वाच्या बातम्या

 तान्हा पोळ्याच्या दिवशी मद्यविक्री बंद



विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / नागपूर : तान्हा पोळा उत्सवादरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी नागपूर शहरातील मद्यविक्रीची सर्व संबंधित अनुज्ञप्तीची दुकाने ११ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार नमुना-ई, नमुना-ई-२, एफएलडब्ल्यू-२, सीएल-२, सीएल-३, एफएल-१, एफएल-२, सीएलएफएलटीओडी-३, एफएल-३, एफएलबीआर-२ आणि टीडी-१ या अनुज्ञप्त्यांच्या माध्यमातून होणारी मद्यविक्री ११ सप्टेंबर रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे.

तान्हा पोळा हा नागपूर शहरातील महत्त्वाचा पारंपरिक उत्सव असून, या दिवशी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे सर्व संबंधित मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.





  Print






Related Photos