महत्वाच्या बातम्या

 प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा


- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन; समस्यांच्या निराकरणासाठी चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरावरील विविध प्रलंबित समस्या आणि मागण्यांच्या निराकरणासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. याच अनुषंगाने संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची गडचिरोली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

प्राथमिक शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देणे, प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणे आणि शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देणे, हा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडत संबंधित विषयांचा पाठपुरावा केला.

प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या विविध समस्या वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनाने सकारात्मक पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रॉयसिडाम, जिल्हा कार्याध्यक्ष शिलाताई सोमनकर, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वासलवार, धानोरा तालुकाध्यक्ष राजू मुंडले, धानोरा तालुका मुख्य सल्लागार संजय मडावी, धानोरा तालुका मुख्य संघटक तेजराज नंदगिरवार, चामोर्शी तालुका प्रसिद्धीप्रमुख सुनील सातपुते, शिक्षक संघाचे मार्गदर्शक तथा केंद्रप्रमुख पुरुषोत्तम गायकवाड, गडचिरोली तालुका मुख्य संघटक प्रकाश कुनघाडकर, शिक्षक संघाचे मार्गदर्शक दिलीप कुनघाडकर, चामोर्शी तालुका संघटक चंद्रकांत वेटे आदी उपस्थित होते.

तसेच अशोक जुवारे, राजकुमार कुळसंगे, जगदीश बावणे, सुखानंद पटणे, कोयले सर, साखरे सर, निकोसे सर यांच्यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे निराकरण व्हावे आणि प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.





  Print






Related Photos