महत्वाच्या बातम्या

 विकसित भारत युवा नेते संवाद प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : मेरा युवा भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे विकसित भारत युवा नेते संवाद २०२७ प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रश्नमंजुषा मेरा युवा भारत पोर्टलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी केवळ पाच मिनिटांचा वेळ देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी अथवा लॉगिन करून आपला सहभाग नोंदवावा. या उपक्रमात सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व पदवीपूर्व विद्यार्थी आणि विशेषतः एनएसएस स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावर आपले विचार आणि नेतृत्वगुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत युवा नेते संवाद - २०२७ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. याशिवाय पात्र एनएसएस स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिन संचलन २०२७ साठी एनएसएस पथकाचा भाग होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

मेरा युवा भारत कार्यालयाचे  जिल्हा युवा अधिकारी यांच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र  युवकांना प्रधानमंक्षी मोदी साहेबांसोबत संवाद साधण्याची ही उत्तम संधी आहे. सर्व पदवीपूर्व विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवकांनी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रश्नमंजुषा व नोंदणीसाठी MY Bharat – VBYLD २०२७ या पोर्टलला भेट देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.





  Print






Related Photos